तुकाराम घडत नाही
तुला इतके कसे कळत नाही
कसे समजावू मना तुला
तुला इतके कसे कळत नाही
जाळल्या शिवाय सोन्याला
उजळपणा मिळत नाही
उठता उठता लहान बाळ
दहा वेळा पडत उठत
त्यातूनच मग एक दमदार
पाउल पुढे पडत
कसे समजावू मना तुला
तुला इतके कसे कळत नाही
शांत , थंड सागरा मध्ये
नावाडी कधीच घडत नाही
लाटा , वादळ आणि पाऊस
यांच्याशी भीड़ल्याशिवाय
खरा खालाशी बनत नाही
कसे समजावू मना तुला
तुला इतके कसे कळत नाही
आड़ल्याशिवाय , लढल्याशिवाय
खरे यश मिळत नाही
बाहेरच्या जगाला सगलेच जिंकतात
पण स्वताला जींकल्याशिवाय तुकाराम घडत नाही
कसे समजावू मन तुला
तुला इतके कसे कळत नाही
लक्ष्यात ठेव यश आपलेच जोवर
मनाने तुम्ही हारत नाही
लढणारा मरून ही अमर
कारण ध्येय त्याचे मरत नाही
कसे समजावू मन तुला
तुला इतके कसे कळत नाही
Wednesday, April 22, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment