Tuesday, November 10, 2009

तुम बिन


तुम बिन जिया जाए कैसे ऐसे जिया जाए तुम बिन
सदियों सी लम्बी है रातें, सदियों से लम्बे हुवे दिन
आ जाओ लौट कर तुम यह दिल कह रहा है
आ जाओ लौट कर तुम यह दिल कह रहा है
फिर शामे तान्हाये जागी
फिर याद तुम आ रहे हो
फिर जान निकल ने लगी है
फिर मुझको तदपा रहे हो
आ जाओ लौट कर तुम यह दिल कह रहा है
क्या क्या न सोचा है मैंने
क्या क्या न सपने सजाये
क्या क्या न चाहा है दिल ने
क्या क्या न अरमान जगाये
इस दिल से तूफ़ान गुज़रते है
तुम बिन तो जीते न मरते है
आ जाओ लौट कर तुम यह दिल कह रहा है
आ जाओ लौट कर तुम यह दिल कह रहा है
तुम बिन जिया जाए कैसे, कैसे जिया जाए तुम बिन

कभी कभी



कभी कभी मेरे दिल मैं ख्याल आता हैं
की ज़िन्दगी तेरी जुल्फों की नरम छाओं मैं गुजरने पाती
तो सादाब हो भी सकती थी
यह रंझो ग़म की सियाही जो दिल पे छाई हैं
तेरी नज़र की सुअहों मैं खो भी सकती थी
मगर यह हो सका
मगर यह हो सका और अब ये आलम हैं
की तु नहीं, तेरा ग़म, तेरी जूस्तजू भी नहीं
गुज़र रही हैं कुछ इस तरह ज़िन्दगी जैसे, इस्से किसी के सहारे की आरजू भी नहीं
कोई राह, मंजिल, रोशनी का सूरज
भटक रही है अंधेरों मैं ज़िन्दगी मेरी
इन्ही अंधेरों मैं रह जाऊँगा कभी खो कर
मैं जनता हूँ मेरी हम-नफास, मगर यूंही
कभी कभी मेरे दिल मैं ख्याल आता हैं

Wednesday, July 22, 2009

फक्त बोलास.........

साधं सोपं आयुष्य, साधं सोपं जगायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं..


मृत्यूसारखी सुंदर गोष्ट

वेडा म्हणाल मला
पण मी वेडा मुळीच नाहि
खरे सांगतो मित्रांणो
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही

जिवन हे पुरतेच छळते
याची जाणीव मात्र
सरणावर जळताना होते
भाई-बंधू सगे सगे-सोयरे
असतात नुसते नावापुरते
यमासारखा खरा मित्र
जिवनात शोधूनहि सापडत नाहि
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही

पाप-पुण्याची गणना
येथे कर्म-कांडाच्या बळावर करतात
केलेली पापे धुण्यासाठी
मग श्री क्षेत्रे फ़िरतात
पृथ्वीवर जेवढे पाप
तेवढे प्रत्यक्ष नरकात सुद्धा नाहि
आणी या नरकातुन सोडवणारा
मृत्यूशिवाय दुसरा कुणीच नाहि
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही

गरिब श्रिमंत, कोण मोठा कोण छोटा
याच्या दरबारि मात्र
सर्वांना सारखीच जागा
नश्वर या जगात
अमर असा कुणीच नाहि
साक्षात स्वर्ग सुद्धा पहायला
मृत्यूशिवाय पर्याय नाहि
म्हणुन म्हणतो मित्रांणो
याला घाबरण्यासारख काहिच नाहि
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही

आयुष्य नक्की काय असतं ?

आयुष्य नक्की काय असतं ?
हासर्या फ़ुलावरचं दव असतं..
नाचर्या मुलाचं नाच असतं..
दुखर्या ह्रुदयाचा घाव असतं..

आयुष्य नक्की काय असतं,
समुद्रात चाललेलं दिशाहिनं जहाजं असतं,
किनारा शोधत फ़िरायच असत,
वादळांनी डगमगुन जायचं नसतं.

आयुष्य नक्की काय असत?
ते एक तलम रेशमी वस्त्र असत..
ज्याचे त्यानेच ते विणायच असत
पण अति ताणायच नसत..

आयुष्य नक्की काय असत?
सतत गुन्तत जाणारे ते एक कोडे असत
ते ज्याचे त्यानेच सोडवायच असत

आई

देव काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा मी पाहिले तुला


वेदना काय असतात माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी सहन केल्या तेव्हा


प्रेम काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यावर जिवापाड प्रेम केले तेव्हा


त्याग काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी त्याग केला तेव्हा


वाट काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तू मला योग्य वाट दाखवालिस तेव्हा


कोणत्याही जाणीवशिवाय आलो होतो या जगात मी

जीवन काय असते हे तू दाखवून दिले मला

कधीतरी असेही जगून बघा.....!!

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासा� ी, समाधानासा� ी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्सा� ी का� ीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

वर्तमान आणि � वि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी � ूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनु� वलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!

कधीतरी असेही जगून बघा.....!!


आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत


Tuesday, July 21, 2009

स्वाभिमान.....


अहं ठेचला गेला.. की,
उफाळतो तो ....... राग..!
राग वांझोटा असला.. की,
होतं ते ....... दु:ख..!
दुःख रिचवावं लागलं.. की,
येते ती ...... लाचारी..!
लाचारी मान्य केली.. की,
येते ती .. कृतिहीनता....... मृत अवस्था..!
जिवंत मुडद्यांना वास्तवाच्या झळा लागल्या.. की,
येतं ते.. भान..!
भानावर असलेल्याने.. केलेली कृती,
म्हणजे स्वाभिमान......!!!
स्व अभिमान.

Aasan

Wednesday, June 10, 2009

ओठांवर आलेले शब्द….

ओठांवर आलेले शब्द…
तुला माहित आहे का …… तुला माहित आहे का ……

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना …
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते …
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले …
अंतर नेहमी वाढत जाते ……

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही …
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही …
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ……

आज आशा वाटेवर मी उभा आहे
समोर काहीच दिसत नाही …
पण मागे फिरावे की नाही
हे ही समजत नाही …

पण या वाटेवर चालत राहण्याचा …
मी प्रयत्न करेन …
तुझ्या सोबत न रहता ,
तुझ्यामानत राहण्याचा प्रयत्न करेन …

मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे …
यात आकर्षणाचा भाग नाही
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर …
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही …

चल हे आयुष्य॥तू तुझ्या मना प्रमाणे जग ..
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव …
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे …

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो…
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते…
क्षुब्ध होऊन

चन्द्रतारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येता

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलानाच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगली तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक ?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

Monday, June 1, 2009

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण

मानला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही

रात्री छान च असतात ……… तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देवून जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही …… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच

प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही …..

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगायच…….!!!!!!!!!!!!

तुझ्या सोबत जगायच, तुझ्या सोबत मरयच,
उन्च भरारी घेउन, आकाशाला गवसनि घालायच……!!!!

मनान तुझ्यासाठी झुरायच नि तनान तरसायच,
तुझ्या मिठीत येउन काचेसारख विखरुन जायच…….!!!!

सम्पुर्न जगाला विसरुन, तुला नि फक्त तुलाच आठवायच,
या आठवणीत इतक रमायच की स्वतःला देखिल विसरुन जायच……!!!!

प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,
सोना, माझ्या प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,

नि माझ्या प्रत्येक स्वप्नात,
फक्त हे एकच स्वप्न पहायच, फक्त हे एकच स्वप्न पहायच……..!!!!!!!!

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगयच…….!!!!!!!!!!!!

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगयच…….!!!!!!!!!!!!


तुझ्या सोबत जगयच, तुझ्या सोबत मरयच,
उन्च भरारी घेउन, आकाशाला गवसनि घालायच……!!!!

मनान तुझ्यासाठी झुरायच नि तनान तरसायच,
तुझ्या मिठीत येउन काचेसारख विखरुन जायच…….!!!!

सम्पुर्न जगाला विसरुन, तुला नि फक्त तुलाच आठवायच,
या आठवणीत इतक रमायच की स्वतःला देखिल विसरुन जायच……!!!!

प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,
सोना, माझ्या प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,


नि माझ्या प्रत्येक स्वप्नात,
फक्त हे एकच स्वप्न पहायच, फक्त हे एकच स्वप्न पहायच……..!!!!!!!!

Saturday, May 23, 2009

महाराष्ट्र माझा धर्म

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा!!!तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,पण न्याय हा झालाच पाहिजे…………

मी मराठी आहे… मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे

धन्य हा महाराष्ट्र

लाभली आम्हा अशी आई

बोलतो आम्ही

मराठी

गत जन्माची जणू पुण्याई

आपला महाराष्ट्र, आपली मराठी!!!!!!!!!!

शपथ घ्या, एकीने राहू, प्रगति करू, मराठी बोलू, मराठी टीकवू …

मराठियाची पोरे आम्ही , नाही भिनार मरनाला !

सांगुनी गेला कुणी शाहिर अवघ्या विश्वाला

तीच आमुची जात शाहिरी मळवट भाळी भवानीचा

पो़त नाचवित आम्ही नाचतो , दिमाख आहे जबानिचा

अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,

कुणाचीही हिम्मत नाही “मराठीला” संपवण्याची,

घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,

आणि “मराठी” शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला

येऊद्या कोणत्याही

प्रान्ताच्या स्वारीला

अजूनही गंज

चढ़ला नाही

भवानीच्या धारीला……

नव्या महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेचा आम्हाला अभिमान आहे आणि तीच पताका खांद्यावर घेऊन मिरवण्याचे व्रत आम्ही घेतलेले आहे। अर्थात, हे करतानाही तुकोबारायांची शिकवण आमच्या मनावर बिंबलेली आहे –भले तो देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा अस्सल मराठीपणाची हीदेखील एक खूण आहेच की! त्यामुळेच आमचाही निर्धार आहे, समाजातील जे जे उत्तम, उदात्त आणि सुंदर आहे त्याची पाठराखण करण्याचा आणि त्याचवेळी खोट्यांच्या कपाळी नेम धरून सोटा हाणण्याचाही। अर्थात समाजाच्या हक्कासाठीच्या या लढ्यामध्ये सहभागी होताना तुमची साथही हवीच।विदेशात जाणा-या आणि तिथे यशस्वी होणा-या भारतीयांच्या यादीवर नजर टाकली तरी मराठी माणसाच्या कर्तबगारीची प्रचिती आपल्याला येईल। अर्थात, अशी प्रगती फक्त विदेशावर स्वारी करणा-यांनाच करता आली असे मात्र नाही. मायभूमीशी असलेले नाते कायम ठेवून अनेकांनी कर्तबगारीची अशीच झेप घेऊन दाखवली. कुणी मराठी मातीत केशर फुलवून दाखवला तर कुणी इथे रसरशीत फुले फुलवून विदेशी मार्केटमध्ये नियमितपणे विकण्याचा मार्ग दाखवून दिला. कुणी सुपर कंप्युटर बनवून दाखवला, कुणाची शँपेन पाश्चात्यांच्या सराईत जिव्हाग्रांनाही समृद्ध करून गेली, आजघडीला असे एकही क्षेत्र नाही, ज्यावर मराठी माणसांने आपल्या कर्तृत्वाची लखलखीत मुद्रा उमटवलेली नाही. मराठी पावलांनी ज्या ज्या नव्या प्रदेशात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तेव्हा त्याची पावले आधी तिथे भक्कमपणे उभी राहिली आणि मग त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निश्चितपणे निर्माण केली।

बाबांस ……।बाबा, तुम्ही केलंत - दिलंत - दाखवलंत !

ज्वाला उफाळत जश्या वर जावयाते,

ध्येये तशीच अमुची असू देत माते!

अश्या तुमच्या ध्येयांना म्हणतोय आमचं।

तुम्ही आणलेल्या वादळातलं मूठभर आमच्याही छातीत घेतोय साठवून।

तुमच्या हातातल्या मशालीवर लावतोय आमचीही एक पणती।

अश्या ध्येयांची स्वप्नं पेलवतील ना आम्हाला?

अश्या वादळात अभंग राहील ना आमची छाती?

आणि हातातली ती पणती सांभाळू शकू ना आम्ही?

....अश्या सगळ्या शंका-कुशंका-अविश्वासाला तिलांजली देतोय आज।

तुम्हीच एकदा लिहिलं होतं -

जहाजाबरोबर स्वत:ला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात,

तेथेच बुडता देश वाचवणा-या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात!

बाबा,

अज्ञाताच्या दिशेनं जाताना भेटतील तुम्हाला किनारे,

आणि लाटांचे कल्लोळही। आमची वाट पाहणा-या किना-यांना,

आणि लाटांच्या त्या उग्र कल्लोळांना इतकंच सांगाल?॥

आम्ही अजून जहाज सोडलेल नाही!

एकदा ……...

मला परमेश्वर भेटला

मी त्याला सहजंच विचारलंतु

सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?

माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?

माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला…..

ऐक, मी एक कुबेर बनवला होता…

त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची।

मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची………

लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो………

मनं जप, मनं जोड, माणसं मिळव……

विचार कर………

तेंव्हापासून हे वेड लागलंय………

आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,

खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,

की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय…

मराठी माजी जात

महाराष्ट्र माझा धर्म

Friday, May 22, 2009

तु आहेस म्हणुन.........

तु आहेस म्हणुन.......आयुष्य खुप छान आहे,
तुझ्यामुळेच तर मला,मीमाणुस असल्याचं भान आहे
तशी माझी किंम्मत शुन्यचं होतो मी ही जाणुन
आता मलाही अर्थ आहे तु आहेस म्हणुन..............

Tuesday, May 12, 2009

कशासाठी

कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठ

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

Wednesday, April 29, 2009

Monday, April 27, 2009

उगाचच...

उगाचच... एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...
प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...
गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं
शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...
जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...
हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...
नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!
--------------------------- शतानंद.

आयुष्य खूप सुंदर आहे.......................

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून .........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा,
आयुष्य खूप सुंदर आहे,

सोबत कुणी नसलं तरी,

एकट्यानेच ते फुलवत रहा,

वादळात सगळं वाहून गेल,

म्हणुन रडत बसू नका,

वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका

मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,

सागराकडे अथांगता आहे,

माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,

अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.

आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.

अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून

मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,

उत्साह ध्येयाने भारुन म्हणून .........

आयुष्य खूप सुंदर आहे,

सोबत कुणी नसल तरी

एकट्यानेच ते फुलवत रहा,
आयुष्य खूप सुंदर आहे,

सोबत कुणी नसलं तरी,

एकट्यानेच ते फुलवत रहा,

वादळात सगळं वाहून गेल,

म्हणुन रडत बसू नका,

वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका

मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,

सागराकडे अथांगता आहे,

माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,

अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.

आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून ......... आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसल तरी एकट्यानेच ते फुलवत

Wednesday, April 22, 2009

ने मजसी ने

‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन
‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :

“मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं !
काय घडत होतं ?
हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.
काय मोडणार होतं ?
हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली.
घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।मी नित्य पाहिला होता
त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।सृष्टीची विविधता पाहू
त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।परि तुवां वचन तिज दिधले
पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।त्वरित या परत आणीनविश्वसलो या तव वचनी । मीजगदनुभव-योगे बनुनी । मी
तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी
पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।सागरा प्राण तळमळला ।।१।।
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।ही फसगत झाली तैशी
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।दशदिशा तमोमय होती
तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।की तिने सुगंधा घ्यावेजरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।हा व्यर्थ भार विद्येचा
मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रेनवकुसुमयुता त्या सुलता । रेतो बाल गुलाबही आता । रेफुलबाग मला हाय पारखा झाला ।सागरा प्राण तळमळला ।। २ ।।नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।मज भरतभूमिचा ताराप्रासाद इथे भव्य परी मज भारी ।आईची झोपडी प्यारीतिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।वनवास तिच्या जरि वनिंचा
राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रेबहु जिवलग गमते चित्ता । रेतुज सरित्पते, जी सरिता । रे
हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।
यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?
माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी
विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !

जीवन असच जगायच असत....

जीवन असच जगायच असत.
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.

दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. .
--

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर...

*इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर*
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे

शिवचरित्रातून काय शिकावे?



शिवचरित्रातून काय शिकावे?


शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्‍वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी. शिवाजीराजे प्रयत्नवादी होते; निराशावादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. शिवाजीमहाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते. त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. "शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणीप्रमाणे आदर केला. ""ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे!'' असे उद्‌गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, ""ताई, सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही.'' आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१ व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे? एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजनसमाजातून पुढे आले, कारण शिवाजीमहाराज समतावादी होते. शिवरायांचे राज्य रयतेचे, गरिबांचे, एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य होते. शिवरायांनी कधी भेदाभेद केला नाही. त्यामुळेच वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, कृष्णाजी बांदल, कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, शेलारमामा, बहिर्जी नाईक, हिरोजी भोसले, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम इत्यादी नरवीर शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्‍वासाचे सावट आहे. एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान फळी कशी असेल? शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोशी समाजातील बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, मातंग, महार, कोळी, आग्री, शेणवी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून "समता' शिकावी.शिवाजी महाराज निःस्वार्थी होते. ""एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत म्हणेल, की मुघलच बरे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे दिवे विझवून झोपा,'' अशी शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय "शेतकरीच' जिवंत ठेवायचा नाही, असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. वतनदारी-मिरासदारी बंद केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल. अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज काही अनुष्ठानाला बसले नाहीत किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण नागबळी करायला गेले नाहीत, तर "यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते,' हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा. शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती. याउलट शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते. म्हणजे शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.शिवाजीराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. जगाच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर बहुभाषक असावे, ही प्रेरणा शिवचरित्रातून मिळते. कोणतीही अनुकूलता नसताना शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गाव सोडले. त्यामुळेच ते कोकण, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, जिंजी जिंकू शकले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, मोबाईल, इंटरनेट, फॅक्‍स, ध्वनिक्षेपक इत्यादी अत्याधुनिक साधने नसताना शिवरायांनी अशक्‍य कार्य शक्‍य केले. शिवाजीराजांनी झाडांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. "झाडे सर्वथा न तोडावी. लाकूड-फाटा हवा असेल तर जीर्ण झाड तोडा; पण त्या ठिकाणी नवीन झाड लावा. विनामोबदला शेतकऱ्यांकडून काही घेऊ नका. सागाची, आंब्याची, फळांची झाडे न तोडावीत,' असे आवाहन शिवरायांनी केले होते. आज पर्यावरण धोक्‍यात आले आहे. जागतिक तापमानवाढ हा जगापुढचा गंभीर प्रश्‍न आहे. सजीवसृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर शिवरायांच्या पर्यावरणदृष्टीची अंमलबजावणी करावी लागेल.शिवाजी महाराज आज येणार नाहीत. आज आले तरी आपल्या हाती ढाल-तलवार देणार नाहीत, कारण ढाल-तलवारीची लढाई कालबाह्य झाली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे, संगणक, माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण गाव सोडून न्यायपालिकागड, प्रशासनगड, चित्रपटगड, साहित्यगड, सांस्कृतिकगड, दूरदर्शनगड, शिक्षणगड, धर्मगड, कलावाङ्‌मयगड जिंकले पाहिजेत.

तुकाराम घडत नाही

तुकाराम घडत नाही
तुला इतके कसे कळत नाही
कसे समजावू मना तुला
तुला इतके कसे कळत नाही
जाळल्या शिवाय सोन्याला
उजळपणा मिळत नाही
उठता उठता लहान बाळ
दहा वेळा पडत उठत
त्यातूनच मग एक दमदार
पाउल पुढे पडत
कसे समजावू मना तुला
तुला इतके कसे कळत नाही
शांत , थंड सागरा मध्ये
नावाडी कधीच घडत नाही
लाटा , वादळ आणि पाऊस
यांच्याशी भीड़ल्याशिवाय
खरा खालाशी बनत नाही
कसे समजावू मना तुला
तुला इतके कसे कळत नाही
आड़ल्याशिवाय , लढल्याशिवाय
खरे यश मिळत नाही
बाहेरच्या जगाला सगलेच जिंकतात
पण स्वताला जींकल्याशिवाय तुकाराम घडत नाही
कसे समजावू मन तुला
तुला इतके कसे कळत नाही
लक्ष्यात ठेव यश आपलेच जोवर
मनाने तुम्ही हारत नाही
लढणारा मरून ही अमर
कारण ध्येय त्याचे मरत नाही
कसे समजावू मन तुला
तुला इतके कसे कळत नाही

'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्'

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)
'हिंदू' शब्दाची उत्पत्ती... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५)
हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाहीमहंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६)
हिंदू शब्दाची व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)
हिंदू ह्या दोन अक्षरांतहे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे. - (स.सा.वा.२:४२९)
हिंदुत्व हा एक शब्द नव्हे, तो इतिहास आहे. -(१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २)
हिंदुत्वाचे स्फुल्लिंग जागृत ठेवाअग्निहोत्री ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल. - (१९४१ अ.हिं.ल.प.पृ. १४३)
हिंदुधर्म'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३)
हिंदुधर्मान्तर्गत धर्मांची नावेबहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )
एक धर्मपुस्तक नाही हेच चांगलेकारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल. - (१९३७ हिं.स.प.पृ. ३७)
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाहीहिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो. - (१९२७ हिं.प., स.सा.वा. ३ : ४०)
ग्राह्यतम धर्म - हिंदुधर्मकाही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय ! - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२)
माझे राष्ट्रीयत्वही मानवराष्ट्रात विलीन पावेलजर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन. - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)
हिंदू शब्दाचा भविष्य काळातील संभाव्य अर्थएखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ५४)
हिंदुत्वाची परिणतीहिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत ! - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)

स्वार्थ आणि परार्थ

स्वार्थ आणि परार्थ

' संसार म्हणजे महापूर। माजीं जळचरें अपार। डंखू धांवती विखार। काळसर्प।। ' असे समर्थांनी सांगितले आहे. तुकोबांनीसुद्घा प्रपंचाच्या विषयात , ' सुख पाहाता जवापाडे , दु:ख पर्वता एवढे।। ' असा दृष्टांत दिला आहे. जवाच्या एका दाण्याएवढे सुख असते आणि दु:ख मात्र एखाद्या डोंगराएवढे असते. तुकोबा प्रापंचिक , समर्थ पारमार्थिक. दोघांचे मार्ग वेगळे पण प्रपंचाबद्दल , संसाराबद्दल दोघांचेही एकमत असल्याचे आढळते. कारण काय ? कारण केवळ या दोघांचीच नव्हे , तर आपल्या सर्व संतांचीच जगाकडे पाहाण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म अशी होती. लहानसहान गोष्टींचेही महत्त्व त्यांनी बरोबर जाणले होते आणि त्या महत्त्वाच्या आधारे त्यांनी आपल्या विचारांची बैठक पक्की केली होती. संसाराचे दु:ख , प्रपंचाचे व्यापताप अनुभवल्याशिवाय परमार्थाकडे मन ओढ घेणार नाही , असेही सर्व संतांचे सांगणे आहे. अशारीतीने संसाराच्या तापानें पोळलेल्या जीवाला परमार्थाच्या शीतलतेची ओढ लागणे वेगळे आणि मुळापासूनच पारमाथिर्क विचार बीजरूपाने को होईना पण मनाच्या उदरात बळावणे हे वेगळे. पारमार्थिक विचार हा प्रापंचिक विचाराला छेद देणारा आहे , असे समजण्याचे कारण नाही. भगवंतानी भगवद्गीतेत , ' तू जे जे काही कर्म करशील ते ते मला अर्पण कर ' असे सांगितले आहे. आद्य शंकराचार्यांनी शिवस्तुती करताना , ' यद् यद् कर्म करोमि तत्तअखिलं , शंंभो तवाराधनम्।। ' हे शिवशंकरा , मी जे जे काम करतो ते ते काम ही तुझीच आराधना आहे , असे भावोत्कट उद्गार काढले. याचा अर्थ आपल्या जीवनाची संगत आपण परमेश्वराबरोबर घातली पाहिजे. जीवनमार्गाची संगत परमार्थ मार्गाशी घालावयाची म्हणजे नेमके काय करावयाचे ? असे तुम्ही मला विचाराल! सोपे आहे , ' स्वार्थ हेतुला दिला संक्षेप ज्यांनी जीविती , तो पराथीर् पाहती ' ज्यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीत स्वार्थाचे महत्त्व कमी केले आणि दुसऱ्याचा आनंद तोच आपला आनंद अशा वृत्तीने आपला जीवनमार्ग चोखाळला ते धन्य होत , असे कवि यशवंतांना सांगावयाचे आहे. दुसऱ्याच्या आनंदाने आपण आनंदी होणे , हीच पारमार्थिक विचारांची पहिली पायरी आहे. दुस-यांबद्दल विशेष स्वरूपाची आत्मियता वाटल्याशिवाय हा उच्चदर्जाचा आनंद उपभोगता येणार नाही. तुम्ही दोघांचा विचार करू लागलात की आपोआपच तुमची दृष्टी बदलेल. जगात मोठमोठ्या परोपकारी संस्था , विविध लोकांचे क्लब जे आहेत त्यांच्या ध्येयवाक्यात ' दुसऱ्याचा विचार करा ,' असा उपदेश आपल्याला आढळतो. आजकालचे अनेक साधुसंतसुद्घा अशाच स्वरूपाचे विचार मांडत असताना दिसतात. प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार करावयाचे ठरविले तर दुसरा त्या प्रत्येकाचा विचार करणारच! म्हणजे एकमेक एकमेकांचा विचार करू लागतील. दुसऱ्याला दु:ख देऊ नये असे जेव्हा कोणी म्हणतो त्यावेळेला समोरच्या माणसानेही त्याला दु:ख देऊ नये हे अभिप्रेत असते. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाशी प्रेमाने , परोपकाराने वागता , त्याच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता आणि तो मात्र तुमच्याशी तशा वृत्तीने न वागता उलट तुमच्या सद्प्रवृत्तीचा गैरफायदा घेतो असे दिसले तर काय करावयाचे ? ह्या बाबतीत विविध संतांची आणि विचारवंतांची मते वेगवेगळी आहेत. ' दु:ख परानें दिधले , उसनें फेडूं नयेचि सोसावें। देईल शासन देव तयाला , म्हणुनी उगेंची बैसावे।। ' असे कोणी कवि सांगतो. तर आपले समर्थ , ' धटासी व्हावे धट , उद्घटासी उद्घट ' असा रोखठोक सल्ला देतात. आता हे दोन्ही मार्ग भिन्न आहेत , असे तुम्हाला वाटेल पण तसे ते भिन्न नाहीत. कारण समर्थांचा सल्ला हा जेव्हा समोरची व्यक्ती उद्घट किंवा उर्मट आहे त्याचवेळी आचरणात आणण्यासारखा आहे.समोरचा माणूस कसा आहे हे जोपर्यंत आपल्याला नीटपणे कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी बरेपणानेच वागले पाहिजे , असे समर्थांनी इतरत्रही सांगितले आहे. दुस-याला समजून घ्या , दुसऱ्याच्या वागण्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा असेही समर्थांनी अनेक ठिकाणी नमूद केले आहे. मात्र एका विशिष्ट मर्यादेपलीकडे समोरचा माणूस आपल्याशी तिरका वागतो , हे ध्यानीं आले की तुम्ही त्याच्याशी वागण्याची आपली पद्घत बदला , असेही समर्थ सांगतात. तुकोबा म्हणजे ' शांतीब्रह्मा ' होते. त्यांच्या तसे वागण्याचा ताप निदान त्या काळात तरी त्यांच्या कुटुंबियांना जाणवला असणारच. कारण कोणी काहीही त्रास दिला तर पांडुरंगालाच साकडे घालून पांडुरंगाकरवीच त्याचे पारिपत्य करावे , अशीच त्यांची मनोधारणा दिसते. तुकोबांनी आपल्या अभंगातून दुष्टदुर्जनांना शासन करावे , असे जरूर सांगितले आहे. ' दया तिचे नाव , भुतांचे पाळण। आणिक निर्दाळण। कंटकांचे।। ' म्हणजे समाजकंटकांचे , दुष्टदुर्जनांचे पारिपत्य करणे हीसुद्घा एकप्रकारची दयाच होय , असे तुकोबा म्हणतात. बायकोच्या आधीन झालेल्या माणसाला मोजून जोडे मारावेत , असाही तुकोबांनी सल्ला दिलेला आहे. ' तुका म्हणे ऐशा नरा , मोजुनी माराव्या पैजारा।। ' पण अशा स्वरुपाचा सर्व विचार हे तुकोबांनी केवळ उपदेशापुरतेच मर्यादित ठेवलेले आहेत. तुकोबांनी कोणावर हात उगारला , कोणाला प्रत्यक्ष दुरूत्तरे केली वा आमनेसामने भांडण केले असे त्यांच्या चरित्रात कुठेही आढळत नाही. समर्थांनी मात्र दुर्जनांचे पारिपत्य करण्याचे कार्य जणुकाही स्वत:च्याच अंगावर घेतले होते. त्या शिवाय का त्यांनी हातातल्या कुबडीत गुप्ती बाळगली ? ' दया क्षमा शांती , तेथे देवाची वसति ' इतपत शांतपणाचा महिमा तुकोबा सांगतात. समर्थांना ते तेवढ्या प्रमाणात मंजूर नाही. समर्थांची विचारधारा वेगळी आहे. खरे म्हणजे हे दोघेही समकालीन. जवळपास एकाच टापूत वावरणारे. म्हणजे समर्थ सातारा जिल्ह्यातले आणि तुकोबा पुणे जिल्ह्यातले पण दोघांचे भावविश्व वेगवेगळे असल्यामुळे त्यांची जगाकडे पाहाण्याची आणि दुस-याकडे कुठल्या मर्यादेपर्यंत क्षमाशील दृष्टीने पाहावे , याबाबतची भूमिका वेगवेगळी आहे. मी तुम्हाला नेहमी जो दृष्टांत सांगतो तो याही ठिकाणी लागू पडतो. एकाच प्रकारच्या त्रासाचा , तापाचा सामना करताना कसे वागावे , याबद्दल दोघांंची मते वेगवेगळी आहेत. दोघेही थोर आहेत , दोघेही परमपूज्य आहेत पण या दोन मार्गातून आपण आपला मार्ग निश्चित करताना कालमानाचा , आपल्या अनुकूल-प्रतिकूलतेचा आधार घेऊन तसे वागले पाहिजे.

स्वराज्य

एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य

छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय .............................! झाले बहू,
आहेतही बहू, होतीलाही बहू पण यासम हाच.....!!
महाराष्ट्राचे संस्थापक रा रा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना तमाम
मराठा समाजाचा मानाचा मुजरा.............!! जय भवानी ! जय शिवाजी !!

माय मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

Tuesday, January 6, 2009