Wednesday, August 17, 2011

कोण म्हणत देव नसतो......!

कोण म्हणत देव नसतो
आधार मागितला चालण्यासाठी,
आई-वडिल दिलेत...
जग बघण्यासाठी.

थोड पुढ चालून
प्रवास काटावा म्हटल,
तर मित्र दिलेत
आधारसाठी.....

आल्या जन्मी काही करावस वाटल
जग बघण्यासठी,
गुरु दिलेत....
ज्ञान वाढवण्यासाठी.

कोण म्हणत देव नसतो....

सहवास हवा होता
सुख:दुखाची देवाण-घेवाणासाठी
जीवनाचा जोडीदार दिलास....
भरुन आलेल मन मोकळ करण्यासठी.

सगळ मिळाल्यावर आता मात्र
आभार मानावस वाटल
जन्मदाताच तो.....
शेवटी त्यान त्याच्याच दारात आणुन टाकल

मैत्री केली आहेस म्हणुन.............

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस