Wednesday, June 10, 2009

ओठांवर आलेले शब्द….

ओठांवर आलेले शब्द…
तुला माहित आहे का …… तुला माहित आहे का ……

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना …
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते …
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले …
अंतर नेहमी वाढत जाते ……

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही …
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही …
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ……

आज आशा वाटेवर मी उभा आहे
समोर काहीच दिसत नाही …
पण मागे फिरावे की नाही
हे ही समजत नाही …

पण या वाटेवर चालत राहण्याचा …
मी प्रयत्न करेन …
तुझ्या सोबत न रहता ,
तुझ्यामानत राहण्याचा प्रयत्न करेन …

मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे …
यात आकर्षणाचा भाग नाही
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर …
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही …

चल हे आयुष्य॥तू तुझ्या मना प्रमाणे जग ..
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव …
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे …

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो…
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते…
क्षुब्ध होऊन

चन्द्रतारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येता

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलानाच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगली तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक ?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

Monday, June 1, 2009

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण

मानला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही

रात्री छान च असतात ……… तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देवून जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही …… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच

प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही …..

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगायच…….!!!!!!!!!!!!

तुझ्या सोबत जगायच, तुझ्या सोबत मरयच,
उन्च भरारी घेउन, आकाशाला गवसनि घालायच……!!!!

मनान तुझ्यासाठी झुरायच नि तनान तरसायच,
तुझ्या मिठीत येउन काचेसारख विखरुन जायच…….!!!!

सम्पुर्न जगाला विसरुन, तुला नि फक्त तुलाच आठवायच,
या आठवणीत इतक रमायच की स्वतःला देखिल विसरुन जायच……!!!!

प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,
सोना, माझ्या प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,

नि माझ्या प्रत्येक स्वप्नात,
फक्त हे एकच स्वप्न पहायच, फक्त हे एकच स्वप्न पहायच……..!!!!!!!!

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगयच…….!!!!!!!!!!!!

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगयच…….!!!!!!!!!!!!


तुझ्या सोबत जगयच, तुझ्या सोबत मरयच,
उन्च भरारी घेउन, आकाशाला गवसनि घालायच……!!!!

मनान तुझ्यासाठी झुरायच नि तनान तरसायच,
तुझ्या मिठीत येउन काचेसारख विखरुन जायच…….!!!!

सम्पुर्न जगाला विसरुन, तुला नि फक्त तुलाच आठवायच,
या आठवणीत इतक रमायच की स्वतःला देखिल विसरुन जायच……!!!!

प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,
सोना, माझ्या प्रत्येक श्वासात तुला आनुभवायच,


नि माझ्या प्रत्येक स्वप्नात,
फक्त हे एकच स्वप्न पहायच, फक्त हे एकच स्वप्न पहायच……..!!!!!!!!