Saturday, May 23, 2009

महाराष्ट्र माझा धर्म

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा!!!तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,पण न्याय हा झालाच पाहिजे…………

मी मराठी आहे… मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे

धन्य हा महाराष्ट्र

लाभली आम्हा अशी आई

बोलतो आम्ही

मराठी

गत जन्माची जणू पुण्याई

आपला महाराष्ट्र, आपली मराठी!!!!!!!!!!

शपथ घ्या, एकीने राहू, प्रगति करू, मराठी बोलू, मराठी टीकवू …

मराठियाची पोरे आम्ही , नाही भिनार मरनाला !

सांगुनी गेला कुणी शाहिर अवघ्या विश्वाला

तीच आमुची जात शाहिरी मळवट भाळी भवानीचा

पो़त नाचवित आम्ही नाचतो , दिमाख आहे जबानिचा

अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,

कुणाचीही हिम्मत नाही “मराठीला” संपवण्याची,

घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,

आणि “मराठी” शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला

येऊद्या कोणत्याही

प्रान्ताच्या स्वारीला

अजूनही गंज

चढ़ला नाही

भवानीच्या धारीला……

नव्या महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेचा आम्हाला अभिमान आहे आणि तीच पताका खांद्यावर घेऊन मिरवण्याचे व्रत आम्ही घेतलेले आहे। अर्थात, हे करतानाही तुकोबारायांची शिकवण आमच्या मनावर बिंबलेली आहे –भले तो देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा अस्सल मराठीपणाची हीदेखील एक खूण आहेच की! त्यामुळेच आमचाही निर्धार आहे, समाजातील जे जे उत्तम, उदात्त आणि सुंदर आहे त्याची पाठराखण करण्याचा आणि त्याचवेळी खोट्यांच्या कपाळी नेम धरून सोटा हाणण्याचाही। अर्थात समाजाच्या हक्कासाठीच्या या लढ्यामध्ये सहभागी होताना तुमची साथही हवीच।विदेशात जाणा-या आणि तिथे यशस्वी होणा-या भारतीयांच्या यादीवर नजर टाकली तरी मराठी माणसाच्या कर्तबगारीची प्रचिती आपल्याला येईल। अर्थात, अशी प्रगती फक्त विदेशावर स्वारी करणा-यांनाच करता आली असे मात्र नाही. मायभूमीशी असलेले नाते कायम ठेवून अनेकांनी कर्तबगारीची अशीच झेप घेऊन दाखवली. कुणी मराठी मातीत केशर फुलवून दाखवला तर कुणी इथे रसरशीत फुले फुलवून विदेशी मार्केटमध्ये नियमितपणे विकण्याचा मार्ग दाखवून दिला. कुणी सुपर कंप्युटर बनवून दाखवला, कुणाची शँपेन पाश्चात्यांच्या सराईत जिव्हाग्रांनाही समृद्ध करून गेली, आजघडीला असे एकही क्षेत्र नाही, ज्यावर मराठी माणसांने आपल्या कर्तृत्वाची लखलखीत मुद्रा उमटवलेली नाही. मराठी पावलांनी ज्या ज्या नव्या प्रदेशात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तेव्हा त्याची पावले आधी तिथे भक्कमपणे उभी राहिली आणि मग त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निश्चितपणे निर्माण केली।

बाबांस ……।बाबा, तुम्ही केलंत - दिलंत - दाखवलंत !

ज्वाला उफाळत जश्या वर जावयाते,

ध्येये तशीच अमुची असू देत माते!

अश्या तुमच्या ध्येयांना म्हणतोय आमचं।

तुम्ही आणलेल्या वादळातलं मूठभर आमच्याही छातीत घेतोय साठवून।

तुमच्या हातातल्या मशालीवर लावतोय आमचीही एक पणती।

अश्या ध्येयांची स्वप्नं पेलवतील ना आम्हाला?

अश्या वादळात अभंग राहील ना आमची छाती?

आणि हातातली ती पणती सांभाळू शकू ना आम्ही?

....अश्या सगळ्या शंका-कुशंका-अविश्वासाला तिलांजली देतोय आज।

तुम्हीच एकदा लिहिलं होतं -

जहाजाबरोबर स्वत:ला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात,

तेथेच बुडता देश वाचवणा-या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात!

बाबा,

अज्ञाताच्या दिशेनं जाताना भेटतील तुम्हाला किनारे,

आणि लाटांचे कल्लोळही। आमची वाट पाहणा-या किना-यांना,

आणि लाटांच्या त्या उग्र कल्लोळांना इतकंच सांगाल?॥

आम्ही अजून जहाज सोडलेल नाही!

एकदा ……...

मला परमेश्वर भेटला

मी त्याला सहजंच विचारलंतु

सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?

माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?

माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला…..

ऐक, मी एक कुबेर बनवला होता…

त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची।

मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची………

लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो………

मनं जप, मनं जोड, माणसं मिळव……

विचार कर………

तेंव्हापासून हे वेड लागलंय………

आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,

खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,

की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय…

मराठी माजी जात

महाराष्ट्र माझा धर्म

Friday, May 22, 2009

तु आहेस म्हणुन.........

तु आहेस म्हणुन.......आयुष्य खुप छान आहे,
तुझ्यामुळेच तर मला,मीमाणुस असल्याचं भान आहे
तशी माझी किंम्मत शुन्यचं होतो मी ही जाणुन
आता मलाही अर्थ आहे तु आहेस म्हणुन..............

Tuesday, May 12, 2009

कशासाठी

कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठ

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही